नाशिक नव्हे ‘शूर्पणनखा नगरी’! विद्रोही साहित्य संमेलनात कोकाटेंचा जावईशोध

162

विद्रोही साहित्य संमेलनातून कायम हिंदू धर्म, हिंदू ग्रंथ, प्रथा-परंपरा, इतिहास यांवर बिनबुडाची टीका केली जाते. याच उद्देशाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून फारकत घेत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनाच्या प्रथेप्रमाणे तथाकथित इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी एक असंबंद्ध विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक ही ‘शूर्पणनखा नगरी’ आहे, कारण या नाशिकचा पाया शूर्पणनखाने रचला आहे, असा दावाही कोकाटे यांनी केला.

काय म्हणाले कोकाटे?

शूर्पणखा ही गोदा खोऱ्यातील देवी आहे. आजच्या नाशिकमध्ये तिचे वास्तव्य होते. त्याचे पुरावे आहेत. नाशिकच्या पायाभरणीत तिचा वाटा आहे. त्यामुळे नाशिक शहरावर शूर्पणखेचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे नाशिकचे नामांतर हे ‘शूर्पणनखा नगरी’ असे करण्यात यावे, अशी मागणीही कोकाटे यांनी केली. पेशवे हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत. पेशवे काळातच महिलांचा छळ झाला होता. कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात असत. कर मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मारहाण केली जाई, असा दावाही कोकाटे यांनी केला. त्याच बरोबर महात्मा फुले हेच पहिले शिवशाहीर आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्व प्रथम शोधून काढली. त्यांनीच 908 ओळींचा पोवाडा शिवरायांवर लिहिला. त्यामुळे तेच पहिले आणि खरे शिवशाहीर आहेत, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा इस्लाम धर्म नव्हे, दहशतावादी गट! हिंदू धर्म स्वीकारल्यावर वसीम रिझवींचे वक्तव्य)

श्रीमंत कोकाटे नव्हे भंपक पेकाटे! भाजपाचा घणाघणात

नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे यांच्या या दाव्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. हे श्रीमंत कोकोटे नाही, तर भंपक पेकाटे आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. बाकी विचाराल तर रामायण काल्पनिक… मात्र नाशिक वर पहिला हक्क शूर्पणखेचा… ‘भम्पक पेकाटे’, असेही ट्विट भातखळकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.