पुण्यात परदेशी प्रवाशांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

117

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा पिंपरी-चिंचवड शहरात प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-यांना विमानतळावरच 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करावे, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला केली.

एकाच दिवशी 6 रुग्णांना संसर्ग

परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील अशा 6 जणांना ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे. एकाच दिवशी 6 रुग्णांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोनाच्या पहिला, दुस-या लाटेनंतर ओमायक्रॉनचे नवीन संकट आले आहे. शहर पुन्हा टेन्शनमध्ये आले आहे. ओमायक्रॉनला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. उपयायोजना हाती घ्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

(हेही वाचा मंदाकीनी खडसेंना ईडीच्या चौकशीपासून दिलासा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.