माजी मंत्री तसेच सध्या भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या २८ डिसेंबरला अंकिता यांचा विवाह होणार आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.
राजकीय चर्चांना उधाण
निहार ठाकरे हे बिंदूमाधव ठाकरे सुपुत्र तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बिंदूमाधव ठाकरे यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. तर अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. ठाकरे-पाटील यांच्या विवाहामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
( हेही वाचा : 15 डिसेंबरपासून सुरू होणार बैलगाडा शर्यत? )
राज ठाकरेंना निमंत्रण
हर्षवर्धन पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका, तर राज ठाकरे हे सख्खे चुलत काका आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबात अनेक विवाह सोहळे संपन्न झाले आहेत. गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्या घरातील लग्न कार्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. आता सर्वत्र अंकिता-निहार यांच्या विवाहाची चर्चा रंगली आहे.
Join Our WhatsApp Community