मानवतेला लाजवेल अशी घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथे चार महिलांचा विनयभंग करण्यात आला. रस्त्याच्या मधोमध त्यांचे कपडे काढण्यात आले, एवढं करुनही लोकांचे समाधान झाले नाही, त्यांनी त्या महिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुमारे तासभर चाललेल्या या घटनेत चारही महिला दयेची याचना करताना दिसत आहेत.
दुकानातून चोरी केल्याचा आरोप
त्या महिला फैसलाबादमधील एका मार्केटमध्ये कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. तहान लागली म्हणून त्या उस्मान इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्या आणि पाण्याची बाटली मागू लागल्या. मात्र दुकान मालक सद्दाम याने दुकानातून चोरी केल्याचे समजून त्यांच्यावर आरोप करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तेथे गर्दी जमली. जमावाने महिलांचे कपडे काढले, त्यांना रस्त्यावर नग्न केले आणि त्यांना मारहाणही केली, असे पीडितांनी सांगितले.
( हेही वाचा :पनामा, पॅराडाईज पेपर लीक : भारतातील अघोषित संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क! )
पोलिसांनी कारवाई केली
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना अटकही करण्यात आली असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community