लष्कराचे हेलिकॉप्टर बुधवारी, ८ डिसेंबर रोजी तामीळनाडू येथील कोन्नूर या ठिकाणी कोसळले. त्यात चीफ अॉफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपीन रावत यांचा समावेश होता. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर 3 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये रावत यांचा समावेश आहे. रावत हे सुखरूप असल्याचे समजते. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.
An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu.
An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
#Breaking #Breaking Visuals from helicopter crash. Sources said General Bipin Rawat CDS were onboard.
Indian army helicopter with senior defence official crashes in #Coonoor of #TamilNadu #HelicopterCrash pic.twitter.com/MBDFNstsKy
— Bhoopendra Singh 🇮🇳 (@bhoopendratv007) December 8, 2021
हवामान खराब झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. हे हेलिकॉप्टर जेव्हा खाली कोसळले, तेव्हा त्याने पेट घेतला. त्यातून ३ जणांना वाचवण्यात आले आहे, तर ४ मृतदेह सापडले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ अॉफ डिफेन्स, जनरल बिपीन रावतसह १४ जणांचा समावेश होता. त्यामध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत याही होत्या, असे समजते. त्यात ६ लष्करी अधिकारी होते. हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग आणि हवालदार सतपाल हे होते. कर्नाटक आणि तमीळनाडू सीमेवर हा अपघात झाला. एम-आय १७ व्ही५ असे हे हेलिकॉप्टर होते. या अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. हे हेलिकॉप्टर अधिक सुरक्षित असते, त्याला दोन इंजिन असते. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. त्याच्या उड्डाणपूर्वी हे हेलिकॉप्टर तपासले जाते.
Join Our WhatsApp Community