त्र्यंबकेश्वरला विधी करण्यासाठी आलेल्या यजमानाला पळविल्याने, हिरावडी परिसरात दोन पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यावेळी एका पुजाऱ्याने स्वतः कडील गावठी कट्टा दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी शिताफीने तपास करत असताना त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत.
पुजाऱ्यांचा वाद
नागपूरहून यजमान त्र्यंबकेश्वर येथे विधी करण्यासाठी आला होता. या यजमानाला पळविले म्हणून पुजाऱ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी करण्यात झाली. हिरावाडी परिसरात मोकळ बाबानगर येथे या पुजाऱ्यांचा वाद सुरू होता. पंचवटी पोलिस स्टेशनच्या बीट मार्शलनी घटनास्थळी धाव घेतली.
( हेही वाचा : बिपीन रावत असलेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले! )
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या टीमने शिताफीने तपास करत या पुजाऱ्यांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, दोन फोर व्हीलर व सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात घेऊन, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात पोलिस सहाय्यक आयुक्त मधुकर गावित यांनी अधिक माहिती देत, यासंदर्भात पंचवटी पोलिस स्टेशन येथे भा.द.क 160 3/25 4/25 भारतीय हत्यार कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community