तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हेही गंभीर जखमी झाले आहेत. हे हेलिकॉप्टर देशातील सर्वाधिक सुरक्षित हेलिकॉप्टर मानले जाते. एमआई-17 वी5 हेलिकॉप्टरचा उपयोग संरक्षण मंत्री, सेना प्रमुख या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी होतो. एमआई-17 वी5 या हेलिकॉप्टरला दोन इंजिन आहेत. जर एक इंजिन बंद पडले, तर दुसरे इंजिन सुरु केले जाते. कुन्नूर येथील दुर्घटनेबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे. यावर संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन म्हणाले की, एमआई-17 वी5 हेलिकॉप्टरचा अपघात होण्यामागील खरे कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल. मात्र अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा अपघात होण्यामागे ४ प्रमुख कारणे असू शकतात.
(हेही वाचा बिपीन रावत असलेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले!)
ही आहेत अपघाताची कारणे :
- तांत्रिक बिघाड – ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली असेल, यावर ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन म्हणाले, याचा अंदाज लावणे शक्य नाही. कारण एमआई-17 वी5 हेलिकॉप्टरला दोन इंजिने असतात. जर एक इंजिन बंद पडल्यास दुसरे इंजिन सुरु करून हेलिकॉप्टर जमिनीवर आणता येते.
- हवामान बिघाड – अचानक हवामान बिघाड झाल्यामुळेही असे अपघात होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हे हेलिकॉप्टर उडाले, तेव्हा तिथे धुके पडले होते. हे आता पायलट आणि कंट्रोल रूमशी शेवटच्या क्षणी केलेल्या संवादातून स्पष्ट होईल.
- नैसर्गिक कारण – हेलिकॉप्टर उडाल्यानंतर मध्येच पक्षी धडकणे अथवा मोठ्या वृक्षाला हेलिकॉप्टर धडकणे यामुळेही अशा दुर्घटना होऊ शकतात. या अपघाताचे हे कारण असेल तर तसे ते चौकशीतून समोर येईल.
- घातपाताचा कट – अती सुरक्षित समजल्या जाणारे एमआई-17 वी5 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होणे यामागे घातपात असणे, याची दाट शक्यता आहे. हेही चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
(हेही वाचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह होते ‘हे’ चौदा सहकारी!)
Join Our WhatsApp Community