कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनमुळे सध्या देश भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यातच महाराष्ट्रातील पहिला ओमायक्राॅनचा रुग्ण डोंबिवलीमध्ये आढळला होता. त्याला कल्याणच्या आर्ट गॅलरी इथल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या बाबतीत आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून, त्याला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्याला, पुढचे सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केडीएमसी आयुक्तांनी दिली माहिती
कोविड रिपोर्ट आणि ओमीक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही सुदैवाची बाब म्हणजे या रुग्णामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती की त्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची केलेली कोवीड चाचणी निगेटिव्ह आली होती. त्याचबरोबर 27 नोव्हेंबरपासून केडीएमसीच्या विलगीकरणात असताना या रुग्णाची दोन वेळा कोविड चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्यांमध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अखेर बुधवारी संध्याकाळी त्याला डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
राज्यातील पहिला ओमायक्राॅनचा रुग्ण
33 वर्षांचा हा व्यक्ती राज्यातील पहिला ओमायक्रॉन बाधित होता. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिका, दिल्ली आणि मुंबई असा प्रवास केला होता. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर आता हा व्यक्ती बरा झाला आहे.
( हेही वाचा :ओबीसी आरक्षण : निवडणुका रद्द करण्यासाठी सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात )
Join Our WhatsApp Community