BCCI ने विराट कोहलीला का दिले होते ४८ तास?

136

टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाद झाल्यावर संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्या क्षणी, विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती. टी-२०चे कर्णधारपद सोडल्यावर आता, एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुराही रोहित शर्माकडे गेली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निवड समितीने बुधवारी रोहित शर्माला २०२३ च्या विश्व चषकापर्यंत भारताचा एक दिवसीय कर्णधार म्हणून घोषित केले. रोहितने भारताचा दीर्घकाळ कर्णधार विराट कोहलीची जागा घेतली.

त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपद सोडण्यासाठी आणि दीर्घकाळ कर्णधाराला सन्मान देण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिल्याचा दावा पीटीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. विराट कोहलीने त्याचे पालन केले नाही. आणि ४९ व्या तासाला त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. धोनीनंतर विराट कोहली संघाचा कर्णधार झाला. आता कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असेल आणि मर्यादित षटकांचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल.

( हेही वाचा : भारताला मोठा धक्का! ‘हे’ तीन दिग्गज खेळाडू मुंबई टेस्टमधून आऊट )

विराटची कामगिरी

एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माचे भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच आयसीसीनेही रोहितचे अभिनंदन गेले. एकदिवसीय कर्णधार म्हणून विराट कोहलीने 95 पैकी 65 सामने जिंकले आणि 27 गमावले आहेत, तर T20 मध्ये कोहलीने 50 पैकी 30 सामने जिंकले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.