आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) च्या माध्यमातून ५ वर्षांखालील कमी वजनाच्या, कुपोषित आणि गंभीर कुपोषित मुलांची अंदाजे संख्या प्राप्त केली जाते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (2019-21) च्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ (2015-16) च्या तुलनेत ५ वर्षांखालील मुलांचा पोषण निर्देशांक सुधारला आहे.
बालकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण ३८.४ टक्क्यांवरून ३५.५ टक्के पर्यंत कमी झाले आहे, तर शरीराची झीज होण्याचे प्रमाण २१ टक्क्यांवरून १९.३ टक्के पर्यंत कमी झाले आहे. आणि बालकांचे कमी वजन असण्याचे प्रमाण ३५.८ टक्क्यांवरून ३२.१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
एकात्मिक पोषण अभियान
पोषण अभियान 2.0 अंतर्गत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी 2021-2022 च्या अर्थसंकल्पात एकात्मिक पोषण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य, निरामयता तसेच आजार आणि कुपोषणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पोषण घटक, त्यांचे वितरण आणि त्यांचे परिणाम या गोष्टी बळकट करण्याचा या अभियानाचा प्रयत्न आहे.
( हेही वाचा :विदर्भातील संत्रा बागा नामशेष होणार ? )
मार्गदर्शक तत्त्वे जारी
या अभियानाअंतर्गत पोषण गुणवत्ता, मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधील चाचणी सुधारण्यासाठी, वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी आणि प्रशासनात सुधारणा होण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आली आहेत. पूरक पोषण वितरणामध्ये पारदर्शकता तसेच पोषण परिणामांचा शोध घेण्याच्या दृष्टीने १३ डिसेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यसभेत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community