कोरोना काळात लॉकडाऊन आणि ऑनलाईन शिक्षण यामुळे इंटरनेट, मोबाईल फोनचा वापर लहान मुले अधिक प्रमाणात करू लागली. यामुळेच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) अलिकडेच “लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचे परिणाम” या विषयावर एक अभ्यास आयोजित केला होता. यात शारीरिक, वर्तनात्मक, मानसिक व सामाजिक या परिणामांचा समावेश होतो. ज्यासाठी देशाच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील पाच हजार मुलांची नमुन्यादाखल निवड केली.
एकाग्रतेची पातळी कमी
या अभ्यासानुसार, २३.८० टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्ट फोन वापरतात. याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. अतिवापरामुळे लहान मुलांमधील एकाग्रतेची पातळी कमी होते. अभ्यासानुसार, ३७.१५ टक्के मुलांना नेहमी किंवा वारंवार स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
( हेही वाचा : दिलासादायक! ओमायक्राॅनचा पहिला रुग्ण परतला घरी )
खेळासाठी प्रोस्ताहित करणे
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community