संजय राऊत म्हणतात, ‘मी वापरलेला ‘तो’ शब्द योग्यच!

122

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेला उत्तर देताना शिवीगाळ केली, त्यामुळे भाजपने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना राऊत यांनी आपण या शब्दावर ठाम असून, काय तक्रार करायची ती करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.

वापरलेला शब्द चुकीचा नाही

या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही. हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे, असे राऊत म्हणाले. टीकाकारांनी अभ्यास केला पाहिजे. मला वाटले होते, भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यांचे वाचन चांगले आहे. ते रामभाऊ म्हाळगी सारखी संस्था चालवतात. तिथे सुशिक्षीत कार्यकर्ते निर्माण करतात, असे वाटत होते. पण अशा प्रकारचे कार्यकर्ते ते निर्माण करतात हे मला माहीत नव्हते, असेही राऊत म्हणाले.

तो शब्द बोलीभाषेचा!

हा शब्द भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनेकदा वापरला आहे. त्यांचे पंधरा ट्विट दाखवेन, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द वापरला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनेक नेते हा शब्द वापरतात, कारण तिथला ग्रामीण भागातील तो शब्द आहे. मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे, त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच, कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.