मुंबई विमानतळावर पकडले ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्स

100

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४७ कोटींचे हेरॉईन हवाई गुप्तचर विभागाने पकडले आहे. याप्रकरणी दोन झिम्बाब्वे नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे.

३५ किलो हेरॉईन हे अमली पदार्थ मिळाले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात ड्रग्स येणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी सुरु केली असता झिम्बाब्वे येथून आलेल्या दोन नागरिकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळील सामानाची तपासणी केली असता त्यात अधिकाऱ्यांना ३५ किलो हेरॉईन हे अमली पदार्थ मिळाले.  जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे वजन ३५ किलो असून ते झिम्बाब्वे देशातून तस्करी करून आणण्यात आले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत किंमत सुमारे २४७ कोटी असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही झिम्बाब्वे नागरिकाची कसून चौकशी करण्यात येत असून हे अमली पदार्थ कुठे घेऊन जाण्यात येणार होते, याची चौकशी सुरु आहे.

(हेही वाचा धैर्यशील, द्रष्ट्या, कुशल रणनीतीकाराच्या निधनाने नि:शब्द झालो! – प्रविण दीक्षित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.