काय आहे ‘मेडे काॅल’? बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेनंतर का सुरू झाली चर्चा?

142

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक बातम्या समोर येत असून अपघाताबाबत अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत. अपघातापूर्वी विमानाच्या चालकाने आपत्कालीन स्थितीत दिलेला डिझास्टर सिग्नल जारी केला नव्हता, असेही काही अहवालांतून समोर आले आहे.

अशा स्थितीत हे ‘मेडे’ काय आहे आणि कधी वापरलं जातं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला ‘मेडे’शी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहोत आणि त्याचबरोबर आणीबाणीच्या काळात फक्त ‘मेडे’ का वापरला जातो आणि या शब्दाचा अर्थ काय आहे हे या बातमीत समजून घेऊया.

 काय असतो ‘मेडे’?

‘मेडे’ हा एक प्रकारचा कॉल आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत विमान किंवा जहाजातील कर्मचाऱ्यांच्या वतीने नियंत्रण कक्षाला केला जातो. सोप्या भाषेत सांगायच, तर जेव्हा एखादे विमान किंवा जहाज आपल्या गंतव्यस्थानी जात असते आणि वाटेत एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे विमानात किंवा जहाजात बसलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो, तेव्हा नियंत्रण कक्षाला या आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती दिली जाते, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. याला डिस्ट्रेस कॉल म्हणतात, जी आपत्कालीन परिस्थितीत पाठवलेली माहिती असते.

 ( हेही वाचा: विधान परिषदेच्या ‘त्या’ १७ जागा भाजपचे बिघडवणार गणित?)

हा कॉल कसा केला जातो?

हा कॉल विमान किंवा जहाजातील कर्मचा-यांकडून पाठवला जातो. या काॅल दरम्यान खास पद्धतीने ‘मेडे’ असं बोललं जातं. एकामागून एक ‘मेडे’ असे तीन वेळा बोलले जाते, जेणेकरुन जो ऐकत आहे त्याचा गैरसमज होऊ नये किंवा त्याने त्यातून दुसरा अर्थ काढू नये. हा शब्द मोठ्याने उच्चारला जातो. यानंतर जी काही अडचण किंवा समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याची माहिती दिली जाते.

‘मेडे’ शब्दाचा अर्थ काय 

हा शब्द 1920 च्या आसपास वापरात आला. आता प्रश्न असा आहे की, आणीबाणीच्या काळात पायलट फक्त ‘मेडे’च का बोलतो? तर त्याचा अर्थ जाणून घ्या. वास्तविक, हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. फ्रेंचमध्ये m’aider हा शब्द आहे, ज्याचा अर्थ “मला मदत करा” असा होतो. या प्रकरणात, फ्रेंचमध्ये मदत करण्यासाठी m’aider चा वापर केला जातो आणि venez m’aider चा अर्थ “मला मदत करण्यासाठी या” असा होतो. त्यानंतरच अमेरिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘मेडे’चा वापर सुरू केला आणि तो सलग तीन वेळा पुकारला गेला. तेव्हापासून हा शब्द रुढ झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.