आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आर्यन खानला प्रत्येक शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे. प्रत्येक आठवड्याची हजेरी बंद करण्यासाठी आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला असून या अर्जावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती, त्यानंतर २६ दिवस आर्थर रोड तुरुंगात काढल्यानंतर आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने आर्यन खानला जामीन देण्यापूर्वी १४ अटी लागू केलेल्या आहेत, त्यापैकी एका यात म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आर्यन खानने एनसीबीच्या मुंबई कार्यालयांत हजेरीसाठी उपस्थित रहावे लागणार होते.
(हेही वाचा भूमिगत कचरा पेट्या अडकल्या युटीलिटीजच्या जाळ्यात!)
६ आठवडे एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली
३० ऑक्टोबर रोजी आर्यन खान आर्थर रोड तरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने दर आठवड्याच्या शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत ६ आठवडे एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. एनसीबी कार्यालयात हजेरीला येताना आर्यनला प्रसार माध्यमांना प्रत्येक आठवड्यात सामोरे जावे लागते, तसेच क्रूझ प्रकरणाचा तपास मुंबई विभागाकडून काढून दिल्ली विभागाकडे देण्यात आला आहे. आर्यनने जामीनावरील अटी शिथिल करण्यासाठी उच्च न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याअर्जावर १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.