राहुल गांधींच्या सभेला महाविकास आघाडी परवानगी नाकारणार?

119

काँग्रेसचा 28 डिसेंबरला 136वा स्थापना दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे एक सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला खासदार राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारचा काँग्रेस एक भाग आहे. पण, आता या काँग्रेसच्या सभेला महाविकास आघाडी सरकार परवानगी देणार नसल्याचं म्हटलं जातं आहे.  कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे वाढत राहिल्यास काँग्रेसच्या सभेला परवानगी देण्याबाबत प्रशासनाला विचार करावा लागेल,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितलं.

परवानगीसाठी अर्ज

काँग्रेसने आधीच बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये सभेसाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला आहे, कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या मैदानाच्या वापरावर निर्बंध आहेत. हा अर्ज आता नगरविकास विभागाकडे असून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

त्यामुळे परवानगी मिळू शकेल

ओमायक्रॉन प्रकार प्रत्येकासाठी चिंतेचा विषय आहे. पण सध्या मुंबईत ओमायक्रॉनचे जास्त रुग्ण नाहीत. त्यामुळे या सभेला परवानगी मिळेल. असं मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले. सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करुनच हा मेळावा भरवण्यात येईल. बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेस स्थापना दिनानिमीत्तने सभेसाठी आम्ही उत्सुक आहोत, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

 ( हेही वाचा:परवानगी नाही तरी हजारो मुसलमान एमआयएमच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.