नवाब मलिकांना दुसरा धक्का, घरी पडणार धाड! काय केले ट्विट?

160

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिल्यावर मलिकांनी शुक्रवारी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर लागलीच मलिकांनी ट्विट करत त्यांच्या घरी ‘पाहुणे’ येणार आहेत, असे ट्विट करून घरावर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी या केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे याना लक्ष्य केले. त्यामुळे मलिक कायम चर्चेत राहिले. आता त्यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे. नवाब मलिक यांनी याची माहिती आधीच ट्विटद्वारे दिली.

(हेही वाचा न्यायालयाने खडसावल्यावर मलिकांना उपरती, वानखेडेंची मागितली माफी)

काय म्हणाले नवाब मलिक?

साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.

मोहित कुंभोज यांची टीका!

नवाब मलिकांच्या ट्विटवर भाजपचे नेते मोहित कुंभोज यांनी टीका केली. मलिक यांनी सर्वात आधी मोहित कुंभोज यांना लक्ष्य केले होते, तेव्हापासून कुंभोज यांनी मलिकांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. मलिकांच्या ट्विटवर कुंभोज यांनी उत्तर देताना, ‘नाखून काट के शहीद बनना बंद करो मियाँ नवाब, जिस दिन आए गे पता भी नहीं चलेगा’, असे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.