‘संजय राऊत दिल्लीत कायम पवारांच्या कार्यालयात असतात’

173

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे हाच प्रश्न उपस्थित करत दिल्लीमध्ये राऊत राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते  शिवसेनेत कधी होते, काय केले पक्षासाठी?, अशी प्रश्नांची सरबत्ती भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

संजय राऊत हे बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशा प्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोलही राणे यांनी केला. डीएमके नेत्या कमिमोळी यांनी लोकसभेत त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेनेने त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना राणे यांनी आपण कागदावर न पाहता आकडेवारीसह उत्तर दिलं, असे उत्तर दिले.

(हेही वाचा शिवसेनेच्या ‘या’ तीन माजी नगरसेवकांना सक्तमजुरी)

२५ वर्षे मोदी सरकारच

कोरोनासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार चांगले काम करत आहे. ओमायक्रॉन या नव्या कोरोनाच्या विषाणूसंदर्भातही विविध प्रभावी उपाययोजना केंद्राकडून केल्या जात आहेत. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने चालला आहे. हे सरकार मोदींचे सरकार आहे, ते पुढचे २५ वर्ष हलते नाही, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.