वनअधिका-यांची पोलीस ठाण्याला भेट

96

वांद्र्यात अजगराची शेपटी कापून मांडूळ बनवण्याच्या प्रकरणी शुक्रवारी वनविभागाने वांद्रे (प.) येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी लेखी अहवाल देण्याची मागणी वनविभागाने केल्याची माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव यांनी दिली. पोलिस ठाण्यात घटनेप्रकरणी डायरी नोंद झालीय. मात्र गुन्हा नोंदवला जात नसल्याचे पोलिसांकडून लेखी पत्र मिळाल्यास वनविभाग गुन्हा दाखल करुन प्रकरणाची चौकशी करेल, असेही रामाराव यांनी स्पष्ट केले.

नर अजगराची शेपटी कापल्यानं त्याचं लिंग बाहेर आलंय. वनविभागानं उपचारासाठी अजगराला ताब्यात घेऊन सर्प या प्राणीप्रेमी संस्थेच्या हवाली उपचारांसाठी दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांनी दिली. भोईर यांनी ‘सर्प’ संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन अजगराच्या तब्येतीविषयी चौकशीही केली. अजगरावर अजून दहा ते बारा दिवस उपचार सुरु राहतील, असेही भोईर यांनी सांगितलं.

अजगराच्या तब्येतीविषयी 

वनविभागानं अजगर आमच्याकडे उपचारांसाठी दिलाय. मात्र शेपटी कापल्यानं तो भयंकर चिडलाय. उपचारांत कित्येकदा त्यांनी स्वयंसेवकांना, डॉक्टरांना चावण्याचा प्रयत्न केला. लिंग त्याच्या शरीरात पुन्हा टाकण्याची शस्त्रक्रिया करता येणार नाही. मात्र अजगर स्वतःहून त्यांचं लिंग पुन्हा शरीरात पूर्ववत करु शकतो. त्याची इच्छाशक्ती हवीय. अजगरानं स्वतःहून खाणं सुरु केल्यास तो नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी फीट होईल.
– संतोष शिंदे, सर्प (स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्सस एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम)

नेमकी घटना काय

गेल्या रविवारी वांद्र्यातील भाभा या पालिकेच्या रुग्णालयातील खासगी रुग्णवाहिकेत मांडूळ ठेवल्याची निनावी तक्रार पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अजगराची शेपटी कापून त्याला मांडूळ बनवल्याचे घटनास्थळी भेट देऊन वनविभागाच्या हवाली करण्यासाठी आलेल्या वापरा या प्राणीप्रेमी संस्थेच्या सिद्धार्थ कांबळे आणि दक्ष या स्वयंसेवकांना आढळून आलं. मात्र वांद्रे-कलानगर येथील ब्रीजवर स्वयंसेवकाच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात सिद्धार्थ कांबळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली, त्याला शुक्रवारी रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.