मुंबईत पुन्हा एकदा कोविड बाधित मृत रुग्णांचा आकडा शून्यावर आला आहे. तब्बल दोन महिन्यांनी मृतांच्या आकड्याने शून्याची किमया साध्य केली आहे. शनिवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शनिवारी दिवसभरात २५६ नवीन रुग्ण आढळून आले आणि २२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दुसऱ्यांदा शून्य मृत्युची नोंद
कोविड -१९ सुरू झाल्यापासून दुसऱ्यांदा अशाप्रकारे एकाही मृत्युची नोंद झालेली नाही. यापूर्वी मार्च -२०२० मध्ये कोविड- १९ सुरू झाल्यानंतर यापूर्वी फक्त १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली होती.
सक्रिय रुग्णांची संख्या १८०८
दिवसभरात ४४ हजार ३२१ चाचण्या करण्यात आल्या नंतर २५६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १८०८ एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा २५९२ एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळीची संख्या शून्य एवढी असून इमारतींची संख्या ११ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community