‘ती’ कविता अजूनही झोपू देत नाही! पवारांनी सांगितली अस्वस्थ करणारी आठवण

141

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस. नेहरू सेंटर येथे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव करणारे सामान्य लोक, अनुभव वृद्धींगत करणाऱ्या लोकांचा खास उल्लेख केला. या लोकांमुळेच मी समृद्ध झालोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत अस्वस्थ असते, असे सांगितले. यावेळी त्यांनी आवर्जून मोतीलाल राठोड या कवीचा आणि त्याच्या ‘पाथरवट’ या कवितेचा उल्लेख केला. तशा कविता ऐकून रात्री झोप येत नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘पाथरवट’ ऐकून आपणच गुन्हेगार आहोत असेही वाटत असल्याचे पवारांनी नमूद केले. यावेळी त्यांनी समाजकारण करताना या समाजाच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार याचा विचार करता येतो. पुढे शरद पवार म्हणाले, मी अनेकदा सर्वाधिक वेळ गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवला आहे. त्याच्या मनात किती अस्वस्थता आहे, अन्याय-अत्याचाराबाबत ते काय विचार करतात हे यामुळे ऐकायला मिळते.

अशी आहे कविता

कवीचं नाव मोतीराज राठोड असावं. त्यांची कविता आठवते. मोतीराज हा बंजारा समाजातील कार्यकर्ते. पालंमध्ये राहणारा. मी सहज त्याला म्हटलं काय हल्ली विचार करतो. तो म्हणाला विचार करतो तुमच्या सर्वांच्या विरुद्ध! मी म्हटलं म्हणजे काय? तो म्हणला माझी एक लहानशी कविता आहे. ती म्हणजे पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन दगड फोडणारे.

(हेही वाचा- …तर युती कायम राहिली असती, राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण)

‘कवी म्हणतो, हा मोठा दगड आम्ही घेतला. आमच्या घामानं, कष्टानं, हातोड्यानं आणि हातातल्या छन्नीनं त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर केलं. आणि मूर्तीत रुपांतर केल्यानंतर सर्व गाव आलं. मूर्ती बनविणाऱ्याकडे कुणी ढुंकून बघत नव्हतं. सगळं गाव आलं आणि गावाने वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात स्थापित केली. गंमत काय माझ्या घामाने मूर्ती तयार झाली. पण मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिरात मी दलित आहे. म्हणून मला आता प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे. पण तिचा बापजादा मी आहे. मी असताना तुम्ही मला मंदिरात येऊ देत नाही. ही तुमची समाज रचना आम्हाल उद्ध्वस्त करायची आहे, खरं सांगतो अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वत गुन्हेगार आहे असं वाटतं’, असे शरद पवार कवितेतील भाव आणि त्याच्या वेदना सांगताना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.