आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. अचानक परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. यानंतर भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. या गोंधळानंतर रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
काय म्हणाले आव्हाड
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला ताब्यात घेतले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या भरतीच्या परीक्षेचा पेपर कुठेही फुटला नाही, त्याआधीच कारवाई करण्यात आल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले.
(हेही वाचा – “स्वतःला वाघ म्हणून ‘म्याव- म्याव’ करायचं, अशी शिवसेनेची अवस्था”)
विद्यार्थ्यांची फी म्हाडा परत करणार
महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी सवस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत जवळचे आहे त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे, तसेच वशिल्यासाठी काही लोक मंत्रालयात येतात, मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community