दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर राकेश टिकैत महाराष्ट्र दौऱ्यावर…

102

गेल्या दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी संसदेत तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन केले होते. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर शेतकरी पुन्हा माघारी परतले. तर यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. १७ डिसेंबर रोजी टिकैत तामिळनाडूमध्ये जाणार आहेत त्यानंतर १९ डिसेंबर रोजी वर्धा येथे उपस्थितीत राहणार आहेत.

…म्हणून करणार टिकैत महाराष्ट्र दौरा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या होत्या. यानंतरही विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाही. विदर्भच नाहीतर राज्यभरातील इतर भागातील शेतकऱ्यांना इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत १९ डिसेंबर रोजी वर्धा येथे येणार असून राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा –“स्वतःला वाघ म्हणून ‘म्याव- म्याव’ करायचं, अशी…)

आता स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार

दरम्यान, राज्यातील गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये नैसर्गिक संकट तर, शेतमालाचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले जीवनही संपवले.  त्याशिवाय, पीक विमा, वीज पुरवठा आदींसह इतरही अनेक मुद्दे आहेत. हे मुद्दे सोडविण्यासाठी शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांकडून पुढील रणनीति आखली जात असून ते आता स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचेही सांगितले जात आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरच दिल्ली सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन स्थगित झाले. हे आंदोलन मागे घेतले असले तरी संयुक्त किसान मोर्चा हा शेतकरी संघटनांचा मंच कायम राहणार असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.