दहाव्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट, ५ जण गंभीर

89

मुंबईतील अंधेरी येथील इमारतीची लिफ्ट तब्बल १०व्या माळ्यावरून खाली कोसळली आहे. त्यामध्ये ५ रहिवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अंधेरी पूर्व भागातील बहुमजली इमारतीत हा प्रकार घडला.

मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील गावठाण भागात आझाद रोडवर गुंदवली बस स्टॉपच्या समोर असलेल्या महाकाली दर्शन सोसायटीत हा अपघात झाला. एसआरए प्रकल्पा अंतर्गत उभारलेली ही 16 मजली इमारत आहे. लिफ्ट 10 व्या मजलावरुन खाली कोसळून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सोमवारी, दुपारी बारा वाजून 52 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस सुद्धा घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले आहे.

(हेही वाचा एसटी कर्मचाऱ्यांना समजून घ्या, अरेरावीकरता राज्य दिले नाही!)

जखमींवर रुग्णालयात उपचार

जखमींना इमारतीमध्ये राहणार्‍या स्थानिक रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू करण्यात आले. त्यांना जवळच्या आदित्य नर्सिंग होम या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.