एसटी कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून कामावर रूजू होण्यासाठी आज शेवटची संधी देण्यात आली होती. गेले कित्येक दिवस एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असताना ३४ दिवसानंतर मालवण येथील एसटी आगारातून सोमवारी, सकाळी ९.४५ वाजता मालवण कट्टा ओरस ही बसफेरी सुरू करण्यात आली, अशी माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.
मालवण आगारात परिवहन सेवा सुरळीत
यानंतर दुपारी १ वाजता मालवण कसाल-ओरस ही गाडी सोडण्यात आली आहे. यापुढे रोज सकाळी ९.०५ वाजता मालवण ते ओरस बस सुटणार असल्याची माहिती बोवलेकर यांनी दिली. यावेळी उदय खरात, अमोल कामते, प्रसाद बांदेकर, ए. जी. वाघमारे, जी. वाय. गोळवणकर, एसटी चालक ए. जे. भोगवेकर, वाहक एम. एन. आंबेसकर आदी उपस्थित होते.
( हेही वाचा : भारीच! आता कंडक्टरचं देणार बेस्ट बसचा पास! )
कर्मचारी कामावर रुजू
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हा, असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार येथील आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. इतरही कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर हजर व्हावे, असे आवाहन आगारप्रमुख बोवलेकर यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community