मुंबई महापालिकेची सव्वा कोटींची ‘टिव टिव’

115

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत सन २०१३ पासून @Disaster MgniBMC हे ट्विटर खाते निर्माण केले होते. मान्सून कालावधीत या ट्विटर खात्याचा उपयोग भरती-ओहोटीच्या वेळा, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त हवामान अंदाज, तसेच नागरिकांकरिता काही महत्वाचे संदेश असल्यास त्याची माहिती या ट्विटर खात्यावर दैनंदिन आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रदर्शित करत असे.

परंतु मे २०१९ मध्ये तत्कालिन महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे ट्विटर खाते त्या विभागापुरते मर्यादित न ठेवता मुंबईतील सर्व खात्यांमार्फत केल्या जाणा-या उपाययोजना या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ट्विटर खात्याचा वापर करण्यात यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व विभागीय कार्यालये आणि खात्यांची ट्विटर खाती तयार करुन कार्यान्वित करण्यात आली होती.

जनसंपर्क विभागाने केली कंपनीची निवड

यापूर्वी आपत्कालिन व्यवस्थापन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ट्विटर खात्यांचा कारभार आता जनसंपर्क विभागाच्या अखत्यारित आणला गेला आहे. त्यामुळे सर्व कार्यरत असलेली ट्विटर खाती हाताळणे, तसेच इतर प्रकारच्या सुविधांची जबाबदारी निश्चित करत जनसंपर्क विभागाने यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये पात्र कंपनीची निवड निश्चित करण्यात आली आहे.

( हेही वाचा : अरेच्चा…कैद्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार! )

१ कोटी २९ लाख रुपये खर्च होणार

मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा उचावण्याकरिता समाजमाध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन, अंमलबजावणी सहाय्य याकरिता यंत्रणेची नियुक्ती करणे या कामासाठी एक वर्ष कंत्राट कालावधीकरिता संजित कम्युनिकेशन्स प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह १ कोटी २९ लाख रुपये खर्च होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.