दीपा बारचा उघडा पडला कारभार, १७ बारबाला लपलेल्या ‘या’ ठिकाणी

107

शहरात आजही मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू असल्याचे रविवारी मध्यरात्री समाजसेवा शाखेने एका गैरसरकारी संस्थेच्या मदतीने अंधेरी येथील दीपा बारवर केलेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. पोलिसांनी बारच्या आतमध्ये तयार केलेल्या एका गुप्त खोलीतून १७ बारबालांना ताब्यात घेऊन बार मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

बेकायदेशीर डान्सबार सुरू ठेवला होता

पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील दीपा बारच्या मालकाने सर्वच नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर डान्सबार सुरू ठेवला होता. या बारमध्ये २० ते २५ बारबाला डान्सफ्लोरवर थिरकत असतात, अशी माहिती ‘कवच’ या गैरसरकारी संस्थेला मिळाली होती. या संस्थेने या बारची माहिती स्थानिक पोलिसांना न देता गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला दिली. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास समाज सेवा शाखेचे पोलिस उपायुक्त राजू भुजबळ हे स्वतः पोलिस पथक आणि या संस्थेच्या पदाधिकारीसह दीपा बार वर छापा टाकला. मात्र काही वेळापूर्वीच डान्सफ्लोरवर थिरकणाऱ्या बारबाला गायब झाल्या.

आरशाच्या काचेमागे होती गुप्त खोली

बारमध्ये आलेले पोलिस पथक देखील काही वेळासाठी चक्रावून गेले. संपूर्ण बार शोधला मात्र बारबाला कुठेच दिसत नव्हत्या, परंतु पोलिसांनी मागे न हटता शोध सुरू ठेवला असता मेकअप खोलीत काचेच्या मागे काचेत आणि भिंतीत अंतर आढळून आले. पोलिसांनी उत्सुकते पोटी मेकअप खोलीत जाऊन आरसा तपासला असता या आरसमागे असलेली भिंत पोकळ असल्याचे कळताच पोलिसांनी काच फोडून बाजूला केली केली असता त्यामागे एक छोटेखानी दार आढळून आले.

गुप्त खोलीत सर्व सुखसुविधा

पोलिसांनी ते दार तोडून आत डोकावले असता बारमध्ये केवळ एक गुप्त खोली होती, त्यात माणूस कसाबसा बसू शकेल एवढीच उंचीची जागा मात्र लांबीला सुमारे २० फूट असलेल्या या गुप्त खोलीत बारबालांना लपवण्यात आले होते. या खोलीत एसी (वातानुकूलित यंत्र), खाण्याची सोय, शीतपेयच्या बॉटल जमिनीवर बिछाना एवढी व्यवस्था करण्यात आली होती. समाज सेवा शाखेने एनजीओच्या मदतीने या गुप्त खोलीत लपून बसलेल्या बारबालांना बाहेर काढले असता त्या गुप्त खोलीत एक दोन नाही तर चक्क १७ जणी लपून बसल्या होत्या. तब्बल १५ तास सुरू असलेल्या ऑपरेशन दीपा बार सोमवारी दुपारी संपले.

मॅनेजर, कॅशिअर, वेटर आणि बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल

वाद्यवृंद बारचा परवाना असताना बार मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरू ठेवला होता व वाद्यवृंदला चार महिलांची परवानगी असताना बार मालकाने १७ नर्तकी बारबाला बारमध्ये ठेवल्या होत्या , या बारबाला तोकडे कपड्यात अंगप्रदर्शन करीत अश्लील नृत्य करीत होतेे, हे समोर आल्यानंतर समाजसेवा शाखेने मॅनेजर, कॅशिअर, वेटर आणि बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या बारबालाची रवानगी महिला सुधारगृह मध्ये करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.