दिव्यांगांच्या रेल्वे प्रवासातील अडचणींवर संसदेत उठला आवाज

147

दिव्यांगांना लोकल रेल्वेचा प्रवास करताना मोठ्या दिव्यांतून जावे लागत असल्याने ईशान्य मुंबईतील भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत लोकल ट्रेन आणि स्टेशन दिव्यांग जनांसाठी अनुकूल करण्यात यावे अशी मागणी केली.

पनवेल स्थानकात तोल गेल्याने एका दिव्यांगांचा मृत्यू

“मुंबई शहरात दिव्यांगजनांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे खूप कठीण आहे, मुंबई लोकलमध्ये खूप गर्दी आहे आणि दिव्यांगांसाठी पुरेशी विशेष व्यवस्था नसल्यामुळे दिव्यांगांना या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे अशक्य होत आहे. वर्षभरापूर्वी एका दिव्यांग मुलीचा मृत्यू झाला होता, डोंबिवली ते घाटकोपर असा प्रवास करताना गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये पडून तिचा जीव गेला. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पनवेल स्थानकात तोल गेल्याने एका दिव्यांगांचा मृत्यू झाला. दिव्यांगांसाठी रेल्वे अनुकूल बनवण्याचे रेल्वेचे प्रयत्न असूनही, दिव्यांगांच्या लोकल ट्रेन किंवा लोकल ट्रेन स्टेशन अनुकूल करण्यात आलेले नाही, असे सांगत खासदार मनोज कोटक यांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांच्या चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी विशेष म्हणजे दिव्यांगांना सहज प्रवास करता येईल, याची विशेष काळजी घेतली जावी, अशी विनंती रेल्वे मंत्र्यांकडे केली.

(हेही वाचा सफाई कामगारांना मिळणार १४ हजार रुपये! कसे ते वाचा…)

दिव्यांगांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी

‘दिव्यांगांना मदत हवी असल्यास रेल्वे प्राधिकरण तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वत:ची तरतूद करेल, अशी व्यवस्था करण्यात यावी. दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मुंबई लोकल ट्रेन अनुकूल बनवावी जेणेकरुन आगामी काळात अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये’, असे सभागृहात सांगत संसदेचे लक्ष मुंबईतील या दिव्यांगांना रेल्वे प्रवासातील गैरसोयींवर वेधून घेतले. काही काळापासून स्टेशन आणि लोकल ट्रेनमध्ये योग्य व्यवस्था नसल्यामुळे दिव्यांगांना जीव गमवावा लागला आहे, भविष्यात अशी घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात यावी, तसेच गर्दीच्या वेळी विशेष लक्ष देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.