महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ‘या’ दोन्ही जागांवर ‘कमळ’ फुललं!

81

नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने विजय मिळवला आहे. तर अकोल्यातही भाजपाचं कमळ फुललं आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या अकोला आणि नागपूर या दोन्ही जागांवर भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यातील भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला.

अशी मिळालं मतं

नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून त्यांना 362 मतं मिळाली आहेत. तर छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे.  काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल हे आमने-सामने होते. या चुरशीच्या लढाईत भाजपचे वंसत खंडेलवाल यांना 438 मतं मिळून ते विजयी झाले आहे. खंडेलवाल यांनी शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना (328 मतं) पराभूत केले आहे.

महाविकास आघाडीची मते फुटली

नागपूर पाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला अकोला अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात धक्का दिला आहे. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचे जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली. तर नागपुरात महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.

काँग्रेस नेत्यांची भविष्यवाणी फोल ठरली

भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला होता तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती मात्र ही भविष्यवाणी खोटी ठरली. विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले.तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्के बजावला असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.