आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळानंतर म्हाडाच्या परीक्षांमध्ये पेपर फूटीचा प्रकार आढळल्याने मध्यरात्री परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारकडून घेण्यात येणा-या परीक्षांमध्ये सतत गोंधळ होत असल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता म्हाडाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे.
आता घोटाळा होणार नाही
म्हाडाची परीक्षा टीसीएस म्हणजेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनी अंतर्गत घेतली (MHADA exam TCS) जाणार आहे, अशी घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे आता तरी या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
याआधी म्हाडाने घेतल्या परीक्षा
जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस या कंपनीला म्हाडा भरतीचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, या कंपनीने पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक झाली आहे. या गैरप्रकारानंतर परीक्षार्थींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यापुढे भरती परीक्षा म्हाडाच्या माध्यमातूनच घेण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. त्यानुसार सोमवारच्या बैठकीत चाचपणी करण्यात आली. याआधी म्हाडाने अशाप्रकारे भरती प्रक्रिया स्वत: खासगी संस्थेच्या मदतीने राबविल्या आहेत.
( हेही वाचा :‘अकबर रोड’ सीडीएस बिपीन रावत यांच्या नावाने ओळखला जाणार? )
Join Our WhatsApp Community