महिला सुरक्षित! आता २४ तास रेल्वे डब्यांत ‘तिसऱ्या’ डोळ्याची नजर

139

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन कायम प्रयत्नशील असते. यानुसार जानेवारी २०२२ पर्यंत मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या डब्यात सीसीटीव्ही लावले जातील असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोरोनाकाळात अनेक महत्वपूर्ण कामाचा वेग मंदावला होता परंतु आता वेगाने सीसीटीव्हीचे काम पूर्ण होईल असे रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढत्या गुन्हेगारीला आळा

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर हल्ले, छेडछाड, विनयभंग या घटना होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने २०१५ साली लोकल डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. यानंतर मध्य रेल्वेने हा प्रकल्प सुरू केला. मार्च २०२० मध्ये कोरोना प्रार्दुभावामुळे हे काम ठप्प झाले. परंतु आता जानेवारी २०२२ पर्यंत नियोजित काम पूर्ण करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

( हेही वाचा : पुढील तीन महिने भारतासाठी आव्हानात्मक, तज्ज्ञांची भीती )

जानेवारी अखेरपर्यंत काम पूर्ण होणार

१२ डबा लोकलमध्ये द्वितीय श्रेणीचे तीन डबे आणि प्रथम श्रेणीचे तीन छोटे डबे असतात. यातील प्रत्येक डब्यात २ ते ३ कॅमेरे लावण्याचे प्रयोजन आहे.  मध्य रेल्वेच्या महिला डब्यात एकूण ७४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. यातील १५५ सीसीटीव्ही कॅमेरे २०२० पर्यंत लावण्यात आले होते. आता उर्वरित ५८९ कॅमेरे बसविण्याचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.