भारतानं यशस्वीरित्या कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना केला असला तरीही दुस-या लाटेत हाहाकार माजवणा-या डेल्टाचा विषाणू अद्यापही आढळून येतोय. शिवाय आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा सापडलेला ओमायक्रॉन हा विषाणूही देशभरातील विविध भागांत दिसतोय. या दोन्ही विषाणूंचा एकत्र फैलाव होत असल्यानं पुढील तीन महिने भारतासाठी आव्हानात्मक असल्याचा इशारा राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी दिला आहे.
बाधा टाळण्यासाठी डॉक्टरांचं आवाहन
देशभरातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेत आता कोरोनाच्या डेल्टाबाधित रुग्ण आटोक्यात येत असताना ओमायक्रॉन वेगाने डोके वर काढत असल्याची नोंद वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. ओमायक्रॉनमधील रुग्णांमध्ये सौम्य तापाची लक्षणे नोंदवली जात आहेत, कित्येकांना कोरोनाची काडीमात्र लक्षणे दिसून येत नाही आहेत. त्यामुळे वेगाने पसरणारा ओमायक्रॉनची बाधा टाळण्यासाठी गरजेविना प्रवास करु नका, असे आवाहन डॉक्टरांनी केलंय.
(हेही वाचा – धडकी कायम! जगात ओमायक्राॅनने घेतला पहिला बळी)
आठवड्याभरात ९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त
कोविडचा कोणताही विषाणू हवेच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात पसरतोय. त्यामुळे माणसांनी स्वतःचा थेट हवेशी संपर्क टाळण्यासाठी मास्क वापरणे स्वतःसाठी बंधनकारक करावे, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. राज्यात आतापर्यंत ९ रुग्णांना आठवड्याभरात ओमायक्रॉनमुक्त करण्यात यश आलंय. उर्वरित ९ रुग्णांवरही उपचार सुरु असून, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community