बेशिस्त वाहन चालकांनो सावधान! …नाहीतर भरावा लागणार ‘इतका’ दंड

91

बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी राज्य शासनाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नवीन दंडाच्या रकमेची अंमल बजावणी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आज पासून करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने मोटरवाहन कायद्याच्या नियमात सुधारणा करून दंडाच्या रकमेत ज्या प्रकारे वाढ केली आहे, त्याच प्रकारे शहरातील रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देऊन रस्त्याची देखील सुधारणा करावी, असे मत अनेक वाहन चालकाकडून व्यक्त केले जात आहे.

(हेही वाचा – विदर्भात फडणवीसांची किमया, महाविकास आघाडीची मते फुटली)

राज्य शासनाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या दंडात नवीन नियमानुसार दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. राज्य शासनाने लागू केलेले नवीन नियमाचे दंडाच्या रकमेवर १४ डिसेंबर पासून मुंबई, ठाणेसह इतर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.

असा असणार नवा दंड

  • विना परवाना वाहन चालवणे दंडाची रक्कम ५०० वरून ५ हजार रुपये
  • दुचाकी चालवताना विना हेल्मेटसह वारंवार पकडले गेल्यास प्रत्येक वेळी दीड हजार रुपये
  • वाहन चालवताना मोबाइलवर बोलत असाल तर वाहतूक पोलिस १० हजार रुपये
  • १६ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविल्यास ५ हजारांचा दंड
  • भरधाव वाहन चालविल्यास पाच हजार रुपये
  • विनाकारण हॉर्न वाजवल्यास आवाज एक हजार रुपये
  • वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास चार हजार रुपये
  • रुग्णवाहिका, अग्निशामक वाहनाला अडथळा निर्माण केल्यास १० हजार रुपये
  • वाहनांची शर्यत लावल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये

कायद्यात सुधारणा करून बेशिस्त वाहन चालकांना चाप

वाहतुकीच्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने देश आणि राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दंडाची रक्कम कमी असल्याने नियम मोडले तरी दंड भरून सुटका करून घेऊ, अशी मानसिकता वाहनचालकांमध्ये बळावली आहे. त्यामुळे दंडाची रक्कम वाढवली तरच बेशिस्त वाहनचालकांना लगाम लागेल असे एका वाहतूक पोलीस अधिकारी यांनी संगितले. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सुधारित मोटार वाहन कायदा तयार केला आहे. राज्य शासनाने देखील मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून बेशिस्त वाहन चालकांना चाप बसवण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली असून या नवीन मोटात वाहन कायदा सुधारणाची अंमलबजावणी मुंबईसह राज्यभरात १४ डिसेंबर पासून करण्यात आलेली असल्याचे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन करणं वाहनचालकांना महागात पडणार

या निर्णयामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. नव्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी आशा या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. राज्य शासनाने ज्या प्रकारे मोटार वाहतूक कायद्यात सुधारणा करून दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ केली आहे, त्याच प्रकारे राज्य शासनाने शहरातील रस्त्याची सुधारणा करून रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मत अनेक वाहन चालककडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.