आता नवाब मलिक म्हणतायत धमकीचे पत्र आलंय…

135

महापौर किशोरी पेडणेकर यांना नुकतेच धमकीचे पत्र आले होते. आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. मलिकांना हे पत्र पाठवणा-याने आपण नौदलात कर्नल असल्याचं सांगितलं आहे. या पत्रात समीर वानखेडेंच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

एकाही धमकीला मी घाबरत नाही

समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही, तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला  आहे. या संपूर्ण प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून तक्रार  करणार असल्याचे म्हटले आहे. हे पत्र अभिजित बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून लिहिलं असल्याचं सांगितलं जात आहे. अशा धमक्यांना घाबरत नाही. याआधीही अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या. परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

आधीही देण्यात आली होती धमकी

ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचे मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका, अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर मलिक यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती.

 ( हेही वाचा: मुंबईत रात्रीच्या वेळात सुरू राहणार ‘कोरोना’ लसीकरण केंद्रे )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.