अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे सोलापूरमध्ये द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या मदतीशिवाय बागायतदारांना जगणे अशक्य आहे. शासनाने तत्काळ मदत करावी, कारण राज्यात अवकाळी पावसामुळे दोन लाख एकरांवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी केली आहे. शिवाजी पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उत्तर तालुक्यातील पडसाळी, नान्नज व दारफळ येथील द्राक्षबागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
द्राक्ष बागांचे नुकसान
राज्यात जवळपास ५ लाख एकर द्राक्ष क्षेत्र आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यांची काय अवस्था झाली के शासनाला माहीतच आहे. यावर्षी जून महिन्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिला.
( हेही वाचा : ई-वाहनांना आता रेल्वेचा ‘आधार’! )
द्राक्ष बागायतदारांना मदतीची मागणी
द्राक्ष बागायतदारांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाने द्राक्ष बागायत दारांसाठी मदतीचे पॅकेज देण्याची मागणी शिवाजी पवार यांनी केली आहे. द्राक्ष शेती वाचली नाही, तर शासनाला करही मिळणार नाही, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community