मुलुंडमधील २० अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर!

126

मुलुंड (पश्चिम) परिसरातील ‘नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेट’ या औद्योगिक परिसरात तळमजल्यावरील विविध २० गाळ्यांच्या पुढच्या बाजूस व मागच्या बाजूस अनधिकृत वाढीव बांधकामांवर शनिवारी बुलडोझर चढवण्यात आला आहे. टी विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्यानंतर आता विभाग कार्यालयांमधून अनधिकृत बांधकामांना लक्ष्य केले जात आहे.

Work

३ वेळा नोटीस बजावून कारवाई

मुलुंड (पश्चिम) परिसरातील ‘नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेट’ या औद्योगिक परिसरात तळमजल्यावरील विविध २० गाळ्यांच्या पुढच्या बाजूस व मागच्या बाजूस अनधिकृत वाढीव बांधकामांबाबत मागील ३ महिन्यांपासून संबंधितांना ३ वेळा नोटीस बजाविण्यात आली होती. याबाबत महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाद्वारे नुकतीच धडक कारवाई करून हे अनधिकृत वाढीव बांधकामे तोडण्यात आली. महानगरपालिकेच्या परिमंडळ ६ चे उप आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईसाठी महानगरपालिकेच्या पथकाला मुंबई पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती ‘टी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी दिली आहे.

( हेही वाचा : जंबो कोविड सेंटर रुग्णांसाठी की लाभार्थ्यांसाठी? भाजपचा सवाल )

वाढीव बांधकाम तोडण्यात आले

मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागातील इमारत व बांधकाम खात्याद्वारे करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान सुमारे ८ हजार चौरस फुटांचे वाढीव बांधकाम तोडण्यात आले आहे. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेचे ३५ कामगार, कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. तर मुंबई पोलिस दलाचे २४ कर्मचारी देखील घटनास्थळी तैनात होते. या कारवाईसाठी ४ जेसीबी, २ ब्रेकर, २ गॅस कटर इत्यादीसह इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त अल्ले यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.