दिलासा! बच्चे कंपनीसाठी लवकरच येणार ‘ही’ कोरोनाची लस

120

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लहान मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तीन वर्षांवरील सर्व लहान मुलांना कोरोना विरोधी कोवाव्हॅक्स ही लस येणार आहे. येत्या सहा महिन्यात मुलांसाठी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून कोवाव्हॅक्स ही लस लॉंच कऱण्यात येणार आहे. त्यामुळे लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडण्यापासून सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकेल.

लहान मुलांसाठी कोवाव्हॅक्सची चाचणी सुरू

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पूनावाला यांनी असे सांगितले की, कोवाव्हॅक्स ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी कोवाव्हॅक्सची चाचणी सुरू आहे. कोवाव्हॅक्स मुलांचे कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण करेल. ओमाक्रॉनचा मुलांवर कसा परिणाम होईल हे अद्याप माहित नसले तरी, कोरोनापासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

(हेही वाचा –विदेश प्रवास केलेल्या व्यक्तिसह सात जण ओमायक्रॉनच्या विळख्यात!)

लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात

कोवाव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट, पुणे येथून सुरू झाली असून आम्ही नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोविड-19 लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला कोवाव्हॅक्स नाव देण्यात आले, असे सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले. आजपर्यंत लहान मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळून आलेले नाहीत. शिवाय मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही भीती निर्माण झालेली नाही. असे असले तरी आता लवकरच मुलांसाठी कोविड-19 लस लाँच करणार आहोत, असे अदर पूनावाला यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.