थेट दारात ‘त्या’ स्कूटरची डिलीव्हरी! काय आहेत वैशिष्ट्ये?

163

ओला स्कूटरची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही ओला एस1 आणि ओला एस1 प्रो  बुक केली असेल, तर आता या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी घेण्याची वेळ आली आहे. वास्तविक, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, ‘गड्डी निकल चुकी!’ प्रत्यक्षात ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिस्पॅचिंग सुरू झाली आहे. डायरेक्ट-टू-कस्टमर सेल मॉडेलचा वापर करून कंपनी ओला एस1 आणि ओला एस1 प्रो स्कूटर ग्राहकांच्या दारात पोहोचवणार आहे.

फेम -2 सबसिडीचा लाभ 

अनेक राज्यांनी फेम-2 सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे  ही स्कूटर 10 हजार ते 15 हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकते. अशा परिस्थितीत, जर ही स्कूटर गुजरातमध्ये खरेदी करायची असेल, तर येथे  एस1 स्कूटर फक्त 79 हजार 999 रुपयांमध्ये आणि एस1 प्रो  1 लाख 9 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

या स्कूटरची वैशिष्ट्ये

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पहिल्यांदाच ‘की’ लेस गाडीचा अनुभव घेता येणार आहे, म्हणजेच स्मार्टफोनवरील अॅप्लिकेशनच्या मदतीने स्कूटर चावीशिवाय सुरू करता येईल. या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ‘रिव्हर्स मोड’ फीचर आहे. बसल्या जागीच या स्कूटरने रिव्हर्स मारता येणार आहे. यापूर्वी हा पर्याय इतर कोणत्याही स्कूटरमध्ये देण्यात आलेला नाही. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये साॅंग ऐकण्यासाठी स्पीकर्ससुद्धा बसवण्यात आले आहेत. या स्पीकरच्या माध्यमातून फोन काॅलसुद्धा उचलू शकतो. दुसरीकडे, या स्कूटरमधील बूट स्पेसमध्ये दोन हेल्मेट सहज ठेवू शकता एवढी जागा आहे.

  ( हेही वाचा: सर्वोच्च न्यायलय म्हणाले, ‘अधिकार मिळायलाच हवा, मग व्यवसाय कोणताही असो!’ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.