सुशांत…ड्रग्स..आणि राजकारण

182

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता  या प्रकरणी नवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. त्यातच आता या प्रकरणात ड्रग्सचे देखील कनेक्शन समोर आल्यानंतर आता भाजपा विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन संदर्भात मोदींच्या बायोपिकचा निर्माता संदीप सिंहची चौकशी धक्कादायक असून, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाशी भाजपाचे कनेक्शन काय? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत भाजपाने सीबीआय तपासासाठी एवढी तत्परता कुणाला वाचवण्यासाठी केली असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

तो तर मोदींच्या बायोपिकचा निर्माता

संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा निर्माता आहे. हा चित्रपट २७ भाषांमध्ये बनवण्यात आला आहे आणि या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामे बाजूला ठेवून हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये एवढे नामांकित निर्माते असताना संदीप सिंह यालाच मोदींच्या बायोपिकसाठी कसा काय निवडला गेला. भाजपा बॉलिवूड, संदीप सिंह आणि ड्रग्स नेक्सस यांचा काय संबंध आहे याची चौकशी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी करायली हवी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

मोदींशी संबधित व्यक्तीच वादग्रस्त का?

दरम्यान यावेळी सचिन सावंत यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी संबधित व्यक्तीच वादग्रस्त कशा काय निघतात असा सवाल भाजपाच्या नेत्यांना केला. मोदींचा सूट १० लाखांना खरेदी करणारा व्यक्ती गुजरातमधील व्हेंटीलेटर घोटाळ्यात सापडला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांना बदनाम करण्यासाठी बनवण्यात आलेला, ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचा निर्माता विजय रत्नाकर गुट्टे हाही एका प्रकरणात गुंतला होता. तर मोदींनी, हमारे मेहुलभाई असा आदरपूर्वक उल्लेख केलेला मेहुल चौक्शी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देश सोडून पळून गेला आणि आता संदीप सिंहची ड्रग्स कनेक्शनबदद्ल चौकशी असे एक ना अनेक सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

काँग्रेसच्या आरोपांना भाजपाचे उत्तर

सचिन सावंत यांच्या आरोपांना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंचा बायोपिक संदीप सिंह बनवणार असल्याचा दाखला उपाध्ये यांनी दिला आहे. तसेच ‘थोडा होमवर्क नीट करत जा असे उत्तर त्यांनी दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.