अरेरे! IAF हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मुख्य दुवा हरपला, वरुण सिंह यांचं निधन

110

तामिळनाडूतील कुन्नूर येथे Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचेही निधन झाले. त्यामुळे IAF हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मुख्य दुवा हरपल्याची भावना देशवासियांकडून व्यक्त केली जातेय. 8 डिसेंबर रोजी, CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वरुण सिंह हे एकमेव बचावले होते. बुधवारी ते जीवनाची लढाई हरला. भारतीय हवाई दलाने ट्विट करून ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी जखमी झाले होते. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, 168 तासांची झुंज अपयशी ठरली आहे.

(हेही वाचा – दिलासा! बच्चे कंपनीसाठी लवकरच येणार ‘ही’ कोरोनाची लस)

भारतीय वायुसेनेला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे की ग्रुप कॅप्टनचे आज उपचारादरम्यान निधन झाले. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघातात ते एकमेव बचावलेले होते. वायुसेना अधिकारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत, असे आयएएफने ट्विट करून म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या दुर्घटनेत वरुण सिंह हे 80 टक्के भाजले होते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरुण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. 2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

वरुण हे यूपीतील रहिवासी

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील खोरमा कान्होली गावचे रहिवासी होते. त्यांच्यावर बेंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. वरुण हा ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमानचा बॅचमेट आहे. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने आणि देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांनी देशासाठी केलेली सेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांत. ” अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.