अरे…सूर्याच्या अवकाशात चक्क नासाचा प्रवेश!

115

अमेरिकन अंतराळ संस्था नासा यांच्या ‘पार्कर सोलर प्रोब’ या अवकाशयानाने सूर्याला ‘स्पर्श’ करण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला आहे. नासाच्या ‘पार्कर सोलर प्रोब’ या यानाने हा पराक्रम आठ महिन्यांपूर्वीच केला आहे, परंतु यानापासून माहितीपर्यंत पोहोचण्यात आणि त्यानंतर माहितीचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञांना बराच वेळ लागला. नासाच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे.

पार्कर सोलर प्रोब यानाचे ध्येय काय आहे?

NASA ने 12 ऑगस्ट 2018 रोजी आपले पार्कर सोल प्रोब अंतराळ यान प्रक्षेपित केले. हे यान नासाच्या ‘लिव्हिंग विथ अ स्टार’ कार्यक्रमाचा भाग आहे, ज्याद्वारे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या विविध पैलूंशी संबंधित माहिती समजून घेणे आणि संकलित करणे हे एजन्सीचे उद्दिष्ट आहे. या यानामुळे सूर्याचा अभ्यास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे, असे नासाने स्पष्ट केले आहे. सूर्याच्या वातावरणाचे तापमान, ज्याला कोरोना म्हणतात. याचे तापमान सुमारे 1.1 दशलक्ष अंश सेल्सिअस (सुमारे 20 दशलक्ष अंश फॅरेनहाइट) आहे. या उष्णतेमुळे पृथ्वीवर आढळणारे सर्व पदार्थ काही सेकंदात वितळू शकतात. म्हणूनच शास्त्रज्ञांनी या अवकाशयानामध्ये विशेष तंत्रज्ञानाची उष्णता ढाल बसवली आहेत, जी लाखो अंश तापमानातही सूर्याच्या उष्णतेपासून अवकाशयानाचे संरक्षण करण्याचे काम करतात.

( हेही वाचा : … तर किराणा दुकानातही मिळणार वाईन! )

सूर्याला स्पर्श केला

आम्ही सूर्याला स्पर्श केला आहे! इतिहासात प्रथमच, एका अंतराळयानाने सौर कोरोनामध्ये प्रवेश केला आहे. असे नासाने ट्विटरवर माहिती देत स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.