३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवण्यात येणार आहे. या स्पेशल ड्राईव्हमध्ये मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे माहिती सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्रीराजवर्धन सिन्हा यांनी दिली. हे ‘स्पेशल ड्राईव्ह’ २० डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्रीराजवर्धन यांनी दिली.
९० हून अधिक नाकाबंदी बसवण्यात येणार
कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे मुंबईसह राज्यभरातील वाहतूक पोलिस विभागाने ड्रंक अँड ड्राईव्ह ची विशेष मोहिमेत सुरक्षेच्या दृष्टिने ‘ब्रेथ अनालायझर’ (श्वास विश्लेषक) मशीन वापरणे बंद करण्यात आले आणि त्याऐवजी रक्त चाचणी घेण्यात येत आहे. मात्र कोरोना या साथीच्या आजारामुळे मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ स्पेशल ड्राईव्ह वाहतूक पोलिसांकडून टाळले जात होते. मात्र ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर स्पेशल ड्राईव्ह सुरु करण्यात येत आहे. २० डिसेंबर पासून मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हच्या स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत, या दरम्यान शहरातील महत्वाच्या ठिकाणी ९० हून अधिक नाकाबंदी बसवण्यात येणार असून मद्यपान करून वाहन चालविण्यावर कारवाई करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातील.
दंड २ हजार रुपयांवरून दहा हजार करण्यात
‘आवश्यक असल्यास, आम्ही वाहनचालकांच्या रक्ताचे नमुने देखील गोळा करू’, असे वाहतूक विभागाचे सह पोलिस आयुक्त श्रीराजवर्धन यांनी सांगितले. सुधारित मोटार वाहन कायदा २०१९ नुसार, मद्यपान करून वाहन चालवणे किंवा ड्रग्जच्या नशेत वाहन चालवणे यासाठीचा दंड अनुक्रमे २ हजार रुपयांवरून सुधारित मोटार वाहन नियमानुसार दहा हजार करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्यादा पकडल्या गेल्यास ३ हजार दडावरून १५ रुपये दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती श्री राजवर्धन यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community