डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

168

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे बुधवारी, १५ डिसेंबर २०२१ या दिवशी सायंकाळी ७.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

सावरकर कुटुंबातील जुन्या पिढीतील ते अखेरचे व्यक्ती होते. मुरबाड येथे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्याजवळ राहात होते. श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते. विक्रम सावरकर यांच्याबरोबर ते हिंदु महासभेचीही काम करीत होते. गेल्या काही वर्षांपासून मुरबाड येथे विक्रम सावरकर यांनी स्थापन केलेल्या आणि सध्या रणजित सावरकर चालवीत असलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरातील निवासस्थानी ते राहात होते.

(हेही वाचा : हिंदू व्होट बँक, हिंदुत्व आणि राहुल गांधी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.