जनरल नरवणे यांची ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

107

तीन सेवा प्रमुखांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेले लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते. सीएससीचा अतिरिक्त कार्यभार दिल्यानंतर जनरल नरवणे यांना लवकरच औपचारिकपणे देशाचे पुढचे सीडीएस बनवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीएससी) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्याच्या तीन सेवा प्रमुखांमध्ये नरवणे हे सर्वात ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

तीन लष्करप्रमुखांपैकी वरिष्ठांनाच अध्यक्षपद  

सीडीएस जनरल रावत यांच्या निधनानंतर सशस्त्र दलाच्या प्रमुखपदासाठी जनरल नरवणे यांचे नाव आघाडीवर होते. खरं तर, भारतीय हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 30 सप्टेंबर रोजी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारला. सीएससी या वरिष्ठ पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर लवकरच देशाचे पुढील सीडीएस म्हणून जनरल नरवणे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचे संकेत आहे. देशात सीडीएसचे पद निर्माण होण्यापूर्वी तीन लष्करप्रमुखांपैकी केवळ वरिष्ठांनाच चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष बनवले जात होते.

(हेही वाचा – राज्यात ओमायक्राॅनचा शिरकाव, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर)

लवकर नवीन सीडीएसची नियुक्ती करावी लागणार

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदापूर्वी, तीन सेवेच्या प्रमुखांपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष असायचे. सीमेवर चीन आणि पाकिस्तानला भेडसावणारी सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन सरकारला लवकरात लवकर नवीन सीडीएसची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळेच अपघातानंतर काही तासांत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या (सीसीएस) बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.