आरोपी इंद्राणी मुखर्जीचा गौप्यस्फोट! म्हणते, ‘शीना बोरा जिवंत…’

134

देशात चर्चेत असलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीने हा खुलासा केला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला एक पत्र लिहिले असून त्यात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय म्हटले इंद्राणीने पत्रात…

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या संचालकांना (सीबीआय) ला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने शीना बोराला काश्मीरमध्ये भेटले असल्याचे आणि पाहिले असल्याचे सांगितल्याचे इंद्राणीने तिच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी पत्रात इंद्राणी मुखर्जीने केली आहे. या पत्राच्या व्यतिरिक्त, तिने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे, ज्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – 1971 विजय दिवस: …म्हणून ‘भारत’ धावला बांगलादेशाच्या मदतीला)

२०१२ रोजी शीना बोराची हत्या

२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीच्या चालकावर बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची पहिल्या पतीची मुलगी आहे, २०१२ मध्ये तिची हत्या झाली असून या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. २०१५ पासून इंद्राणी मुखर्जी ही भायखळा महिला तुरुंगात आहे. तिचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता आणि ती लवकरच तिची वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.