सततच्या घसरणीनंतर सोन्याला ‘झळाली’ ! वाचा, आजचा दर

129

सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सततच्या घसरणीनंतर आज मात्र सोन्याच्या दरात किंचीतशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असल्याने सोन्याचे दर वधारले आहेत. आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत वाढ होवून ४६,९१० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६०९ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.

(हेही वाचा –‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस)

जाणून घ्या, आजचा दर

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,६९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९१० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०९ रुपये आहे.

सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

  • मुंबई – २२ कॅरेट – ४६,९१० रुपये, २४ कॅरेट – ४७,९१० रुपये
  • पुणे – २२ कॅरेट -४६,४१० रुपये, २४ कॅरेट – ४९,६९० रुपये
  • नागपूर – २२ कॅरेट – ४६,९१० रुपये, २४ कॅरेट – ४७,९१० रुपये

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.