नवी मुंबईत राहताय…कामावर वेळेत पोहोचायचंय? वाहतुक कोंडी आणि कमी पैशात ‘कुल’ प्रवास करायचा आहे? नवी मुंबईकरांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण नवी मुंबईकरांचा प्रवास आता एकदम सुपरफास्ट आणि गारेगार होणार आहे. येत्या नव वर्षाचे गिफ्ट मेट्रोने आताच नवी मुंबईकरांना दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील असणाऱ्या मार्गाचे तिकीच दर हे ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एनएमएमटी वातानुकूलित बसपेक्षाही मेट्रोचा तिकिट दर कमी आहे. त्यामुळे आता सामान्य लोकंही मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहे.
नवी मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार
या मेट्रो प्रवासाच्या दराची घोषणा सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून करण्यात आली आहे. 2011 मध्ये नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, त्यात अडथळे आल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम बरेच वर्ष रखडले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोच्या प्रतिक्षेत होते, आता त्यांची ही प्रतिक्षा अखेर संपणार आहे.
(हेही वाचा – हुररर्र….राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार!)
मेट्रोचे तिकिट दरपत्रक
सिडकोकडून डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मेट्रोच्या कामाला वेग आला. यावेळी पेंधरपासून ते सेंट्रल पार्क दरम्यानच्या मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे. ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दर किलोमीटरच्या पुढे 40 रूपये मेट्रोचा दर ठेवण्यात आला आहे.
- 0 ते 2 – 10
- 2 ते 4 – 15
- 4 ते 6 – 20
- 6 ते 8 -25
- 8 ते 10 -30