370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरात किती जणांनी जमिनी केल्या खरेदी?

114

ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले. त्यावेळी काही लोकांना भीती होती की, बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करतील आणि जम्मू-काश्मीरची लोकसंख्या वाढेल. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांनी किती जमीन खरेदी केली आहे, याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.

मंत्र्यांनी दिली माहिती

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी संसदेत सांगितले की, घटनेचे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेशाबाहेरील व्यक्तींनी एकूण सात भूखंड खरेदी केले आहेत आणि हे सर्व भूखंड जम्मू विभागात आहेत. राज्यसभेत केंद्र सरकारला विचारण्यात आले की, आतापर्यंत राज्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील काय आहे? उत्तरात नित्यानंद राय म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात भूखंड जम्मू-काश्मीर बाहेरील व्यक्तींनी खरेदी केले आहेत. हे सातही भूखंड जम्मू विभागात आहेत.”

गुंतवणूक करता येणार

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू असताना इतर राज्यातील लोक तेथे जमीन खरेदी करू शकत नव्हते. केवळ राज्यातील लोकच तेथे जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी करू शकत होते. केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यावर हा कायदा राज्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे म्हटले आणि कलम 370 रद्द केल्यानंतर राज्याबाहेरील लोकही तेथे जमीन खरेदी करू शकतील आणि तेथे गुंतवणूक करू शकतील, असा दावा केला.

 ( हेही वाचा: नवी मुंबईकरांची स्वस्तात होणार मेट्रोने ‘कुल’ जर्नी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.