मुंबईतील भटक्या श्वानांना पकडणारी वाहनेच आता भंगारात निघाली आहे. मुंबई पूर्व उपनगरातील तीन आणि शहरातील एक याप्रमाणे श्वानांना पकडणारी चार वाहने भंगारात निघाली आहे. आरटीओच्या नियमानुसार कालबाह्य झालेल्या वाहनांमधून भटक्या श्वानांना पकडताना विभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
श्वानांसाठी नियंत्रण कक्ष
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि देवनार कत्तल खान्याच्या माध्यमातून भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण केले जाते. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून त्यावरील आलेल्या तक्रारीवरून भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यापासून लोकांना होणारा उपद्रव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी श्वानाला पकडणे, त्यांचे रेबीज लसीकरण करणे आणि नसबंदी करून त्यांना मूळ भागात पुन्हा सोडणे आदी प्रकारची कामे केली जाते. यासाठी श्वानांकरता वाहने उपलब्ध करून दिलेली आहे.
( हेही वाचा : अमित शहा पुणे दौऱ्यावर! बदलणार का राजकीय समीकरण? )
कालावधी संपुष्टात
परंतु उपलब्ध असलेल्या या वाहनांपैकी पूर्व उपनगरात ३ डॉग व्हॅन आणि शहरातील एका डॉग व्हॅनचा आरटीओच्या नियमानुसार ८ वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पूर्व उपगरासाठी तीन वाहने आणि शहरासाठी एक वाहने अशा प्रकारे एकूण चार वाहनांची खरेदी आता करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये सर्व प्रकारची बांधणी करून सर्व वाहने १ कोटी २ लाखांमध्ये खरेदी केली जाणार आहे. यासाठी ऍटोनी गॅरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
Join Our WhatsApp Community