भारतीय रेल्वेची ‘राजधानी’ ट्रेन होणार ‘तेजस’मय!

100

प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे नेहमीच उत्तम सुविधा पुरवत असते. याअंतर्गत अनेक उपाययोजना राबवल्या जातात. भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. तेजस रेल्वे गाडीच्या गरजेनुसार इतर चार राजधानी रेल्वे गाड्यांमध्ये आधुनिक बदल करण्यात आले आहेत.

अत्याधुनिक सुविधा

भारतीय रेल्वेने चार राजधानी रेल्वे गाड्यांचे तेजस रेल्वेमध्ये रुपांतर करण्याचे ठरवले होते. यानुसार रेल्वेच्या एलएचबी स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक गाड्यांमध्ये स्वयंचलित प्रवेश दरवाजे आणि प्रवाशांसाठी विशेष सुविधा आहेत. तसेच आग शमन प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जैव शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप डिस्पेंसर तसेच बसण्यासाठी विशेष कक्ष देण्यात आले आहेत. त्यासोबतच एलईडी दिवे, सुरेख रंगसंगती इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : आलिया भट्टने मोडले क्वारंटाईन नियम! गुन्हा दाखल होणार? )

प्रवास अधिक सुखकर

तेजस रुपांतरित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै 2021 मध्ये चालवली होती. आता अन्य राजधानी रेल्वेचेही तेजसमध्ये रुपांतर होणार आहे. यामुळेच लांबचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.